घरकुल प्रश्नावर नगरसेवक आक्रमक
मुख्याधिकारी यांना निवेदन सादर
पोंभूर्णा:- रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मंजुरी देऊन त्यांना लाभ देण्यात यावा. अन्यथा ठिया आंदोलन करण्याचा इशारा विरोधी नगरसेवक आशिष कावटवार,अतुल वाकडे,नंदकिशोर बुरांडे,बालाजी मेश्राम,अभिषेक बद्दलवार,गणेश वासलवार,रिना उराडे व रामेश्वरी वासलवार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नगर प्रशासना कडून लाभार्थ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन प्रशासन वेळ मारुन नेण्याचे काम करित आहे.
झालेल्या विशेष सभेत नगरसेवक आक्रमक होत घरकुल प्रश्न येत्या सात-आठ दिवसात मार्गी न लागल्यास पुढिल विशेष सभेत नगरसेवकांसोबत लाभार्थी सभागृहात येतील जो परिणाम घडेल त्याला संबंधित अधिकारी,पदाधिकारी,प्रशासन जबाबदार राहिल.
शहरातील शेकडो गोरगरीब, अपंग,विधवा,निराधार घरकुल मिळेल या आशेवर विसंबून आहेत. गेल्या पंचवार्षिक पासुन लाभार्थ्यांचे अर्ज धूळखात फाईल बंद करुन ठेवले आहेत व छोट्या-लहान नाहक कारणा साठी त्रास देण्याचे काम प्रशासन करित आहे.
रमाई घरकुल योजनेचा निधी गेल्या 5 ते 6 वर्षापासुन नगरपंचायतच्या बँक खात्यामध्ये जमा आहे.नगर पंचायत मध्ये रमाई योजनेसाठी लाभार्थ्यांचे २५० अर्ज कपाट बंद आहेत. अजुनपर्यंत एक ही रमाई योजनेचा लाभ नगर पंचायत कडून लाभार्थ्यांना देण्यात आलेला नाही.योजनेच्या लाभार्थ्यांना वंचित ठेवून या निधिवरील व्याज दर वाढवून अधिकारी,पदाधिकारी न.पं.च्या उत्पन्नात तर वाढ करित नसतील ना असा ही प्रश्न निर्माण होत आहे.
येत्या सात दिवसात रमाई व प्रधानमंत्री घरकुल योजनेतील जाचक अटी रद्द करून लाभार्थ्यांना तात्काळ व सरसकट लाभ देण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गटनेता आशिष कावटवार,नगरसेवक अतुल वाकडे,गणेश वासलवार,बालाजी मेश्राम,नंदू बुरांडे,अभिषेक बद्दलवार,रिना उराडे व रामेश्वरी वासलवार यांनी नगरप्रशासनाला दिलेला आहे...।