उद्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे चंद्रपूरात #chandrapur

चंद्रपूर:- भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार 2 सप्टेंबरला जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी येत असून शासकीय विश्रामगृह येथे
सकाळी 10 वा आगमन व स्वागत सकाळी 10:30 वा पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी लोकनेते व कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर,भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे,जिल्हाध्यक्ष(श)डॉ.मंगेश गुलवाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
महानगर भाजपाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार प्रदेशाध्यक्ष आ बावनकुळे सकाळी 11 वाजता रॅलीने बैठक स्थळी रवाना होतील.दुपारी 12 वा महेश भवन, तुकुम चंद्रपूर येथे सभा
दुपारी 12.15वाजता स्वागत व सत्कार आटोपल्यावर दुपारी 12.30 ते 2पर्यंत जिल्हा बैठकिला ते संबोधित करतील.
दुपारी2.30 ते 4 दरम्यानआगामी निवडणुकासंदर्भात बैठक तर सायं. 4 ते 5.30 लोकसभा बैठक आटोपल्यावर सायं.5.30 ते 6 सोशल मीडिया बैठक ते घेतील.
सायं.6 ते 7 वा बुथ समीती बैठक,सायं.7 ते 7.30 वा डॉ. गाडेगोणे यांचे घरी भेट सायं 7.30 ते 8 वा महाकाली मंदीर दर्शन ,सायं.8 ते 8.30 वा युवा वॉरियर्स शाखा उद्घाटन,रात्री 8.30 नंतर स्वा. सै. बाबुरावजी बनकर यांचे घरी आ.बावनकुळे भेट देतील,अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत