Top News

डिजिटल मिडिया असोसिएशनच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप #chandrapur #mul


Chandrapur, Maharashtra, India, Vidharbh, BHAIRAV DIWASE, Adhar news network, Adharnewsnetwork, mul, Digitalmediaassociatio, Digitalmediaconvention

चंद्रपूर:- डिजिटल मिडिया म्हणजेच न्युज पोर्टल आज माध्यमांच्या दुनियेत क्रांती करीत असुन जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना तत्काळ जनतेपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य ह्या माध्यमातून सुरू असून केंद्र शासनाने डिजिटल मिडीयाला मान्यताही दिली आहे . अनेक राज्यात शासकीय जाहिराती अधिकृतपणे न्युज पोर्टलला देण्याचे आदेशही निघाले आहे. मात्र पुरोगामी व प्रगतिशील असलेल्या महाराष्ट्र राज्यात डिजिटल माध्यमांना अजूनही जाहिराती देण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

राज्य शासनाचे ह्या संदर्भात लक्ष वेधणे, डिजिटल पत्रकारिता करताना केंद्र शासनाने (central government) घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची व कायद्याची पत्रकारांना माहिती देणे, डिजिटल मीडिया म्हणजेच पोर्टल नोंदणी कशी करावी? माध्यमात कार्य करताना डिजिटल मिडिया प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी, पत्रकारिता कायदे तसेच बातम्यांचे अचुक व सुयोग्य विश्लेषण करण्याच्या संदर्भात पत्रकारांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने डिजिटल मिडिया असोसिएशनने संयुक्तपणे हे निवासी अधिवेशन आयोजित केले होते.

डिजिटल मिडिया असोसिएशन (Digital media association) व डिजिटल मिडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया (Digital Media Publisher and News Portal Grievance Council of India) च्या संयुक्त माध्यमातून मुल (Mul) तालुक्यातील चीतेगाव येथे 19 व 20 नोव्हेंबर दरम्यान आयोजित डिजिटल मिडिया पत्रकारांचे (Digital Media Journalist) दोन दिवसीय अधिवेशन संपन्न झाले

या अधिवेशनाला अध्यक्ष नागपुर उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड फिरदोस मिर्झा, नागपुर खंडपीठाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. आनंद देशपांडे, मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित होते तर विशेष अतिथी व वक्ता ॲड. फराहद बेग, ॲड. कल्याणकुमार, जेष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा एल्गार प्रतिष्ठानच्या संस्थापिका पारोमिता गोस्वामी, झी मीडियाचे आशिष अंबाडे, ई टीव्ही भारतचे अमित वेल्हेकर तसेच विशेष आकर्षण म्हणून लंडन येथे वास्तव्यास असलेले राममोहन खानविलकर हे विशेषत्वाने उपस्थित होते.


डिजिटल मिडिया असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया ह्यांनी सर्व मार्गदर्शक तसेच उपस्थित पत्रकारांचे आभार व्यक्त करून अधिवेशनाची सांगता झाल्याचे घोषित केले.

#Digitalmediaassociation #Digitalmediaconvention #Digital #media #BhairavDiwase #Adharnewsnetwork #chandrapur #Mul https://chat.whatsapp.com/IjBE8p8tZjP3YMYoa7QrzV
👆👆👆👆👆👆
चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने