चंद्रपूर:- सर्वसामान्य नागरिकांची रेल्वे (Railway) म्हणून ओळखल्या जाणारी चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे रोजी सकाळी गोंदियाहून चंद्रपूरकडे येत असतांना केळझर येथील जंगल परिसरात अचानक बंद पडली. बराच वेळ होवूनसुध्दा गाडी सुरू न झाल्याने संतापलेल्या प्रवाशांनी (passengers) थेट जंगलातून रेल्वे रूळाच्या मार्गाने पायदळ चांदाफोर्ट (Chandaport) रेल्वेस्थानक गाठले. अचानक रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
ग्रामीण भागातून चंद्रपूर (chandrapur) शहरात मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातून चंद्रपूर शहरात नोकरीवर असणार्या नोकरदारांची संख्यासुध्दा मोठी आहे. त्यामुळे चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे नेहमीच फुल्ल असते. मंगळवारी सकाळी चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे अचानकपणे केळझर जंगल परिसरात बंद पडली. बराच कालावधी होवूनसुध्दा रेल्वे जागीच असल्याने प्रवाशांचा संयम सुटला. सर्व प्रवासी जंगलातून रेल्वे रूळाच्या मार्गाने पायदळ चांदाफोर्ट स्थानकाकडे निघाले. सर्व प्रवासी कडाक्याच्या थंडीत अवजड सामान सोबत घेत परत चांदाफोर्ट रेल्वे स्थानक गाठून आपल्या कामावर गेले. रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला.
https://chat.whatsapp.com/IjBE8p8tZjP3YMYoa7QrzV
👆👆👆👆👆👆
चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
Slideshow news
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
एकूण पृष्ठदृश्ये
लोकप्रिय पोस्ट
लोकप्रिय पोस्ट
WHAT'SUP GROUP LINK JOIN
सन्मानचिन्ह
आधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..
प्रतिनिधी पाहिजे....
चंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत