प्रेमासाठी काय पण... घर सोडून १७८ मुली भुर्र #chandrapur
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर आयपीसी कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत असतो
मुलींचा शोध लावल्यानंतर प्रेमप्रकरणातून बहुतांश मुली पळून जात असल्याचे समोर आले आहे
तर काहीजण पालकांनी रागावल्यामुळे स्वतःहून घर सोडले असल्याचे समोर आले आहे.
मुलांवर लक्ष कसे ठेवायचे?
पालकांनी आपल्या मुला-मुलीची मित्रमंडळी कोण आहेत. शाळेत जाऊन आपल्या पाल्याचे वर्तन कसे आहे, हे जाणून घ्याये, आपले पाल्य मोबाइलमध्ये किती वेळ देतात, यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच पालकांनी आपल्या मुला-मुलींसोबत मित्रत्वाप्रमाणे संवाद ठेवणेही गरजेचे आहे.
मागील दहा महिन्यांत जिल्ह्यातून १७८ मुली तर ३२ मुलांच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यापैकी १२९ मुली व २९ मुले शोधण्यात संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आहे. तर काही अपहरणातील मुलांचा एलसीबीने शोध लावला आहे. उर्वरीत प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बाळासाहेब खाडे, पोलिस निरीक्षक
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत