एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
0

बल्लारपूर:- वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी सोमवारी तिघांचा मृत्यू झाला. चंदा ज्ञानेश्वर वाघ (६६, रा. जुनोना चौक, बाबूपेठ) आणि यशवंत नगराळे (६०) अशी मृतांची नावे आहेत. एक मृत व्यक्ती अनोळखी आहे.
पेपर मिलमागे रेल्वे रुळाजवळ सोमवारी मध्य रात्रीला चंदा वाघ ही महिला जखमी अवस्थेत पडून होती. पोलिसांनी चंदा यांना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ७२ वर्षे वयाचा अनोळखी इसम बल्लारशाह रेल्वे स्टेशनबाहेर मृत अवस्थेत आढळून आला. तिसऱ्या घटनेत बुद्धनगरातील यशवंत नगराळे हे आपल्या राहत्या घरी सोमवारी रात्री मृतावस्थेत आढळले. ते घरी एकटेच होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)