भामरागड:- भामरागड तालुक्यातील कोठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळेतील ७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाला. हा प्रकार सोमवारी संध्याकाळी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून निवासासोबत भोजनाचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, येथील एका विद्यार्थिनीने गावातील नातेवाईकांकडून अंबाडीची भाजी आणली. त्यानंतर भोजन करताना ती इतरांनाही दिली.
शाळेत गेल्यानंतर ७ विद्यार्थिनींना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. इतर १५ विद्यार्थ्यांनाही त्रास होऊ लागला. या विद्यार्थ्यांना कोठी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निदान झाले, तर उर्वरित १५ विद्यार्थ्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नातेवाईकांकडून आणलेल्या अंबाडीच्या भाजीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तविला. सध्या बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत