Top News

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी घेतला साहित्य संमेलनाचा आढावा #chandrapur


चंद्रपूरात १६, १७ व १८ डिसेंबरला ६८ वे साहित्य संमेलन

भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल, साहित्यिक व कलावंतांचा सहभाग


चंद्रपूर:- विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १६, १७ व १८ डिसेंबरला प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग यांचे अध्यक्षतेत स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत बोकारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.



कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सरदार पटेल महाविद्यालयात याबाबत आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संमेलन कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद काटकर, सूर्यांश अध्यक्ष इरफान शेख, वि. सा. संघाचे केंद्रीय सदस्य डॉ. श्याम मोहरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ ला सरदार पटेल महाविद्यायाच्या संयोजनात प्रथदिंडी नंतर १०.०० वाजता सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ६७ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे पुर्वाध्यक्ष डॉ. म.रा. जोशी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. फिरदौस मिर्जा आणि अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.

संमेलनात ग्रंथप्रदर्शन, शिल्प आणि चित्र यांचे दालन राहणार असून एकुण तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्य आणि संस्कृतीवर विचारमंथन होईल.

उद्घाटन समारोप सत्रांसह, कथाकथन, पाच चर्चासत्रे, अनुभकथन, निमंत्रितांचे कविसमेलन चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील कविंचे स्वतंत्र कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि २ नाटके या संमेलनात सादर होतील. १७ डिसेंबर रोजी भानु कुळकर्णी यांच्याद्वारे "कट्यार काळजात घुसली" हे नाटक सादर केले जाणार आहे. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे हे प्रामुख्याने उपस्थित राहतील असे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी सांगितले.

दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील.

पत्रकार परीषदेला सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. सहकार्यवाह संजय वैद्य, प्रफुल्ल देशमुख, सचिन मेश्राम, सुनिल बावणे व संमेलन समितीतील अन्य सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने