Top News

आष्टा-सोनापुर परिसरात अस्वलाची दहशत #chandrapur #pombhurna



पोंभूर्णा:- तालुक्यातील आष्टा-सोनापुर परिसरात अस्वलाचा मुक्त संचार सुरु असुन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याकडे लक्ष्य देवून अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील आष्टा-सोनापुर परिसरात अनेकांना अस्वलाचे दर्शन झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील आष्टा-सोनापुर, चेक बल्लारपूर व आदि गावे जंगलाच्या व नदी काठी वसलेले आहेत.

सदर परिसरात नेहमी विविध हिंसक प्राण्याचा वावर असतो. मात्र मागील काही दिवसापासून अस्वलीचा या परिसरात मुक्तपणे संचार करीत असल्याने नागरिकांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतात कामावर जाणार्‍या मजुरांमध्ये व सकाळी पोंभूर्णा येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनामधे भीतीचे वातावरण आहे. आठवडाभरात चार ते पाच वेळा मजुरांना व शाळकरी विद्यार्थ्यांना अस्वलांचे दर्शन झाले आहे.

तालुक्यात वनप्राण्यांचे हल्यात सातत्याने वाढ होत असुन अनेकांना जिव गमवावे लागत आहे. अस्वलांचे अनेकांना दर्शन जरी झाले असले तरी अद्याप स्थानिक शेतमजूर, ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांमधे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने ह्याकड़े लक्ष्य देवून त्वरित अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आष्टाचे सरपंच किरण किशोर डाखरे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या कडे केली आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा-सोनापुर परिसरात अस्वलाचा मुक्त संचार सुरु असल्याची माहिती मिळाल्यापासून मागील 3 दिवसांत वन विभागाची चमू सदर ठिकाणी सतत गस्त करीत आहे. फटाके फोडुन अस्वलाना हाकलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
फणिंद्र गादेवार
वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने