Top News

आशिष बिरिया ठरला बेस्ट पोझर #chandrapurचंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन "चंद्रपूर श्री" जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 55 किलो वजनी गटात ब्लॅक गोल्ड जिमच्या आशिष बिरियाने प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेतील "बेस्ट पोझर" चा बेल्ट मिळवला.


70 किलो वजनी गटात ब्लॅक गोल्ड जिमच्या राज अटकपूरवार याने प्रथम क्रमांक पटकावला. तर अरविंद कोंतम यांनी चांगली कामगिरी केली.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यशाबद्दल त्रिलोक बिरिया, विलास समुंद, सतीश असरेट, वीरेंद्र राठोड, इरफान शेख, साहिल गोवर्धन, ब्रविश गोवर्धन, फिरोज भाई, मृणाल वैद्य, विकी अटकपूरवार, करण अमरोजवार, उमेश तुरटी, साहिल काटकर, सुधांशू आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने