Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

६८ वे विदर्भ साहित्य संमेलनातील तिसऱ्या दिवशीचे कविसंमेलन झाले लक्षवेधी #chandrapur


गोंडवानातील कवितांनीही घेतला रसिकांच्या मनाचा ताबा

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर तसेच सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर द्वारा स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिला सञ असलेल्या 'गोंडवानातील कविता' हे सञ कवी संमेलनाध्यक्ष कवी रेवानंद मेश्राम अतिथी कवी प्रवीण आडेकर यांच्या उपस्थितीत काव्यमय मैफील रंगली.
🏥

या कविसंमेलनात जवळपास सर्वच कवींनी उत्तमोत्तम कविता सादर करुन सभागृहातील प्रेक्षकांना मंञमुग्ध केले.या कवीसंमेलनाचे संचालन सुनील बावणे यांनी केले आहे.

🏥
धनंजय साळवे, अर्चना जुनघरे पोटे, संतोष कुमार उईके, अरुण घोरपडे, शंकर लोढे, सरिता पिट्टलवार, चंदू झुरमुरे, विवेक पत्तीवार, महेश कोलावार, भैरव दिवसे, सुनिल पोटे, प्रवीण तुरानकर, शिरिष दडमल, वर्षा मनवर, मनिषा पेंदोर, अनिल पिट्टलवार, संभाशिव गावंडे, जितेंद्र रायपुरे,अर्जून मेश्राम,रामकृष्ण चणकापुरे, नारायण परांजपे, नरेश गंधारे, ज्ञानेश साहेब, अक्षय गहुकर आदी कवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत