Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

बाळासाहेबांची शिवसेनेत अन्य पक्षाच्या कार्यकत्यांचा प्रवेश #chandrapur #gadchiroli #Aheriअहेरी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अहेरी तालुक्यातील येलचील गावातील बहु संख्येने शिवसैनिकांनी, बाळासाहेबांची शिवसेना या गटात अन्य पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रेवश घेतला आहे.

येलचिल गावात जाऊन लोकांचे समस्या जाणून बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख अक्षय करपे यांनी बाळासाहेबांच्या विचारावर येलचिल गावात बैठक घेऊन अध्यक्ष्यखाली शिवप्रेमी यांनी शिवबंधन बांधून प्रवेश घेतला. यामध्ये दुलीचंद धुर्वे, सोनल पुनघाटे, दिपंकर दास, संजू आत्राम, अक्षय कुलमेथे, नागेश आत्राम, गजानन धुर्वे, बिपीन बैरागी, दुलसा पुनघाटी, ईश्वर मडावी, राकेश धोबे, किशोर मडावी, राहुल उराडे, राजकुमार उईके, शंकर धुर्वे, मधुकर मडावी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने विचाराने प्रेरित होऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दररोज पक्ष प्रवेश होत आहे शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. आगामी निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला कार्याचा मोठा फायदा होईल असा विश्वास तालुकाप्रमुख अक्षय करपे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत