स्टेटस ठेवताना काळजी घ्या! पोलीसांनी केला ९ तरुणांवर गुन्हा दाखल #chandrapur #pune #police



पुणे:- इम्प्रेशन मारण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर आपले चित्रविचित्रफोटो आणि स्टेटस पोस्ट करत असतात. पण, असे स्टेटस ठेवताना जपून राहण्याची गरज आहे. कारण, सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन स्टेटस ठेवणे ९ तरुणांना चांगला महागात पडलं आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाने कारवाई करत ९ तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर, हडपसर लागत असणाऱ्या या नऊ तरुणांवर हत्यार बंदी कायद्या अंतर्गत पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही सगळी तरुण मंडळी काही दिवसांपासून फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हातात हत्यार म्हणजेच कोयता घेऊन त्याचा व्हिडिओ काढून प्रसारित करत होते. मात्र तो फोटो चांगलाच व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागला.

यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याची दखल घेत ९ तरुणांवर गुन्हा दाखल केला. तेजस बधे, उदय कांबळे, बाबू सोनवणे, रोहित जाधव, संग्राम थोरात, श्याम जाधव तसेच आणखी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आधीच पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गँग सक्रिय आहे. अजूनही पुण्यात सर्रास दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्यातच लोक सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन स्टेटस ठेवत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने