Top News

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात #chandrapur #accident #death #mul


चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी बसला धडकली, दोघांचा जागीच मृत्यू


मुल:- समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बस च्या धडकेत 2 तरुण जागीच ठार झाले असून बस पलटी झाली, त्यात बस मधील प्रवाश्याना किरकोळ जखमी झाले आहे.

आज सकाळी 10 वाजताच्या सुमारस फिस्कुटी वरून मुलला आपल्या दुचाकीने येत असलेले 27 वर्षीय प्रफुल गुरुनुले आणि 31 वर्षीय संदीप कोकोडे हे दोघेही या अपघातात जागीच ठार झाले असून बस मधील काही प्रवाश्यांना किरकोळ मार लागला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम.एच. 07 सी 9158 ही मुल वरून चामोर्शी ला जात असताना मुल वरून 2 कि.मी. वर असलेल्या उमानदी च्या पुला अगोदर असलेल्या एका छोट्या पुलाजवळ दुचाकी स्वाराने समोर असलेल्या चारचाकी वाहणाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकिस्वार जागीच ठार झाले. तर बस मधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले, दुचाकी स्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाल्याची माहिती बसच्या चालकांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली असून बस मधील काही प्रवश्याना किरकोळ मार लागला आहे. या घटनेची माहिती पोलीसाना होताच घटना स्थळावर धावून आले मृतदेह शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने