विधान परिषद व विद्यापीठात जगन्नाथ बाबा नगरचा बोलबाला #chandrapur


एक शिक्षक आमदार, तर सहा सिनेट सदस्य विजयी


चंद्रपूर:- शहरातील दाताळा मार्गावरील जगन्नाथ बाबा नगर या छोट्याशा वाॅर्डातून चक्क एक शिक्षक आमदार आणि गोंडवाना विद्यापीठांमध्ये सहा सिनेट सदस्य निवडून आल्यामुळे अचानक जगन्नाथ बाबा नगर चर्चेत आलेले आहे.

नुकतेच नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर निवडून गेलेले आमदार सुधाकर अडबाले जगन्नाथ बाबा नगरचे रहिवासी आहेत. काही महिन्यापूर्वी झालेल्या गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या वार्डातून सहा सदस्य निवडून गेले. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या पुढाकाराने शिक्षण क्षेत्रातील या धुरीनांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.


आमदार सुधाकर अडबाले मागील २५ वर्षांपासून जगन्नाथ नगरमध्ये वास्तव्यास आहेत. भाजपचा गढ असलेल्या नागपूर शिक्षक मतदार संघातून त्यांनी मोठा विजय संपादन केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोंडवाना विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत निवडून आलेले प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कुंभारे, प्रा. डॉ. मिलिंद भगत, प्रा. डॉ. दिलीप चौधरी, प्रा. डॉ. सतिश कन्नाके, प्रा. डॉ. सुधिर हुंगे, प्रा. डॉ. प्रविण जोगी असे एकूण सहा सिनेट सदस्य जगन्नाथ बाबा नगर परिसरात राहतात. शेजारील वार्डातील प्रा. विजय बदखल यांची सिनेटचे राज्यपाल मनोनीत सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

आमदार सुधाकर अडबाले व त्यांच्या पत्नी सिमा अडबाले यांच्यासह सात सिनेट सदस्यांचा भव्य नागरिक सत्कार शनिवारी सायंकाळी ७ वाजता चंद्रपूरच्या दाताळा रोडवरील जगन्नाथ बाबा मठ येथे जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या पुढाकारातून पार पडला. यावेळी रक्तदान व रुग्णसेवेकरिता जन विकास सेनेचे अजित (गोलू) दखणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पुरस्कार मिळवल्याबद्दल शुभांगी व प्रशांत खाडिलकर दाम्पत्याची कन्या निशिदा यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पप्पू देशमुख तसेच प्रमुख अतिथी म्हणून सकाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे,जनविकास सेनेचे उपाध्यक्ष घनश्याम येरगुडे, महिला आघाडी अध्यक्षा मनिषा बोबडे, नगिनाबाग प्रभागाच्या माजी नगरसेविका उषाताई धांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्याम मोहारकर, श्री. सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान मठचे सचिव यादवराव ढवस, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय बेले, ओम साईराम ग्रुपचे प्रमोद पुण्यपवार, सार्वजनिक गणेश मंडळचे राजू जुमडे भारत जुमडे तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप कष्टी प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन रमा देशमुख, प्रास्ताविक पल्लवी दाणी तसेच आभार कविता अवथनकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुभाष पाचभाई,केशव कालबागवार, प्रफुल बैरम,मोंटू कातकर,नामदेव पिपरे,धवल माकोडे, भूषण माकोडे,अक्षय येरगुडे,आकाश लोडे,गितेश शेंडे,इमदाद शेख,सुहास अवथनकर,मिना कोंतमवार,माया बोडे,अरुणा महातळे, प्रतिक्षा येरगुडे, मेघा दखने, मेघा मगरे,देवराव हटवार, करूणा तायडे,रूपा बैरम, किशोर महाजन,अमोल घोडमारे, दिनेश कंपू,अक्षय गोहणे आदींनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या