Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

"तो" मद्यधुंद अवस्थेत मुलींच्या वस्तीगृहात शिरला #chandrapur #gondpipariगोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात रात्रीच्या वेळेस मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती चक्क मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात घुसला व त्याने तिथे धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखिल ताडशेट्टीवार असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्याविरोधात वसतीगृहातील मुलींनी तक्रार दाखल केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी शहरातील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात घटना घडली. अखिल हा मद्यधुंद अवस्थेत वसतीगृहात पोहचला व तिथे त्याने मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली. अखिलने मुलींवर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप देखील या तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी गोंडपिपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत