Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

चंद्रपूर जिल्ह्यात घरफोडी #chandrapur



चंद्रपूर:- स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा टाकून चौदा लाखांची रोकड पळवल्याची घटना ताजी असतानाच आता चंद्रपुर शहरालगत असलेल्या दुर्गापुरातील सुमित्रा नगरात घरफोडी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

दुर्गापुरातील चंद्रशेखर समुद्रे यांच्या घरातून 5 लाख कॅश व 11 तोळे सोने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. तीन दिवसाआधी शहरात लगत असलेल्या पडोली मधील स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा टाकून 14 लाखांची रोकड पळवलाची घटना ताजी असतानाच. दुर्गापुरात अजून एक घरफोडी झाल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी सह अनेक अधिकारी घटना स्थळी पोहचले. अधिक तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत