नदीच्या पात्रात वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ #chandrapur #warora #tiger #tigerdeath



चंद्रपूर:- वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक वाघ (नर) मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . ही घटना शनिवारी दुपारी ४.०० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. वर्धा व वरोरा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संयुक्त पंचनामा करून मृत वाघ शवविच्छेदनासाठी टीटीसी चंद्रपूर येथे पाठविले आहे.

पुढील तपास सहायक वनसंरक्षक ( तेंदू) निखिता चौरे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, वनरक्षक नेवारे, केजकर करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने