सुगंधित तंबाखू विक्रेत्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Bhairav Diwase

राजुरा:- राजुरा येथील माता मंदिर वॉर्डात सुगंधित तंबाखूची साठवणूक व विक्री करणाऱ्या मनीष पंजवानी या विक्रेत्याला राजुरा पोलिसांनी अटक केली. या व्यावसायिकांकडून दोन लाखांपेक्षा जास्त तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. यातील अन्य एक विक्रेता फरार झाला आहे. 

शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात तंबाखूचा व्यवसाय असताना सुद्धा अन्न व औषध प्रशासन विभाग मात्र दुर्लक्ष आहे. अशातच जवाहरनगर वॉर्डात तंबाखूची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून दोन लाखांपेक्षा जास्त तंबाखू जप्त केला आहे. यात मनीष पंजवानी या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.