रॅपर एम. सी. स्टॅन ठरला बिग बॉस-16 व्या पर्वाचा विजेता #chandrapur #Mumbai #BigBoss


मुंबई:- तब्बल १९ आठवड्यांपूर्वी सुरुवात झालेल्या बिग बॉस-16 ची अखेर सांगता झाली आहे. रॅपर एम.सी.स्टॅन हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. शोचा होस्ट सलमान खानने स्टॅनचं नाव जाहीर केलं. त्याला चमकदार ट्रॉफीसोबत ३१ लाख ८० हजार रुपयांची बक्षीस रक्कम आणि आय १० Nios कार मिळणार आहे.

स्पर्धेत टॉप-५ मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालीन भनोट आणि अर्चना गौतम पोहचले होते. अखेरीस इतर चौघांना मागे टाकतं मिळालेले वोट्स आणि परफॉर्मन्सच्या आधारे रॅपर एम.सी.स्टॅन विजेता ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत