खाद्य तेलाचे टँकर उलटले, चालक जखमी #chandrapur #Rajura #accident

Bhairav Diwase


राजुरा:- राजुरा तालुक्यातील देवाडा सिद्धेश्वर गावाच्या काही अंतरावर असलेल्या जुन्या आरटीओ चेक पोस्टच्या काही अंतरावर असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाद्य तेलाचा टँकर उलटला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली. यात टँकरचालक जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार खाद्य तेलाने भरलेला टँकर हैदराबादवरून जबलपूरकडे जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात चालक जखमी झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तसेच अग्निशमन वाहनही घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर खाद्यतेल पसरल्याने पाण्याचे टँकर आणून महामार्ग स्वच्छ केला.