Top News

भावाच्या मृत्यूला डॉ. विश्वास झाडे जबाबदार, हंसराज अहीर यांचा आरोप #chandrapurचंद्रपूर:- माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे भाऊ हितेंद्र अहीर यांचा डॉ. विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉ. झाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

अहीर यांचे लहान भाऊ हितेंद्र अहीर यांना १२ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना अतिशय गंभीर अवस्थेत उपचारासाठी डॉ. झाडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी महिना उलटल्यानंतर अहीर यांनी भावाच्या मृत्यूला डॉ. झाडे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने