Top News

अबब..! जिल्ह्यात आढळला 38 किलोचा भलामोठा मासा #chandrapur #gadchiroli #fish


गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटचा टोका वसलेल्या सिरोंचा येथील झिंगे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे सिरोंचाची झिंग्यासाठी विशेष प्रसिद्धी आहे.

अशातच सिरोंचातील नदीपात्रात तब्बल 38 किलो भलामोठा मासा आढळून आला आहे. येथील प्राणहिता नदी पात्रात हा भलामोठा मासा पहिल्यांदाच गळाला लागला असून संपूर्ण सिरोंचात सदर मासा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

सिरोंचा जवळून प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या बारमाही वाहणार्‍या नद्या आहेत. या नद्यांचे पाणी गोड असल्याने या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे आढळून येतात. विशेषत: येथील झिंगे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात प्रसिद्ध असल्याने येथील झिंग्याला मोठी मागणी आहे. सिरोंचात 100 ग्राम ते 400 ग्रामपर्यंतच्या वजनाचे झिंगे मिळतात. या झिंग्याची चव फारच खुमासदार असल्याने येथील झिंग्याला मोठी मागणी आहे. अशातच येथील प्राणहिता नदीपात्रात तब्बल 38 किलोचा बोध जातीचा भलामोठा मासा येथील मासेमारी करणा-यांच्या गळाला अडकला.

सदर मासा शहरात दाखल होताच शहरवासीयांनी सदर मासा बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. पहिल्यांदाच एवढा मोठा मासा सिरोंचा दृष्टीस आल्याने या माशाला बघण्यासाठी मच्छी बाजारपेठेत शहरवासीयांनी गर्दी करीत तोंडात बोटे घातली.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #Adharnewsnetwork #bhairavdiwase #Wardha #crimepatrol #crimenews #crime #police #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #nagpur #pombhurna #Gondwanauniversitygadchiroli #sardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #spchandrapur #Sironcha #fish #38kgfish 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने