हुकुमशाहीची अधिकृत सुरवात:- खासदार धानोरकरचंद्रपूर:- कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. 2024 चा पराभव त्यांना याच भीतीतून खासदारकी रद्द करण्याची कारवाई मोदी सरकारने केली,. ही हुकमशाहीची अधिकृत सुरुवात आहे, अशी टिका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचीवालयाने घेतला आहे. मोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली मात्र, न्यायालयाने 30 दिवसाचा अवधी देऊन देखील, आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अदानी प्रकरणावर मोदी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे संसदे बाहेर राहूल गांधींना काढण्याचे पाप या सरकारने केले, असे धानोरकर म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत