दोन दुचाकी वाहनासह चोरी करणारा आरोपी ताब्यात

Bhairav Diwase
0

वरोरा:- पोलीस स्टेशन वरोराच्या गुन्हे शोध पथकाने दोन दुचाकी वाहनासह चोरी करणारा आरोपी ताब्यात घेऊन अटक केली. मागील आठवड्यात वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एका चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन तीन दुचाकी वाहन जप्त केले होते. हे विशेष

 वरोरा पोलीस स्टेशन हद्दी मधून मागील काही दिवसात दुचाकी वाहने चोरी जाण्याच्या घटना घडत होत्या. वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास गुप्त माहिती मिळाली त्यावरून राजु बालाजी दुर्वे वय 33 राहणार अर्जुनी तालुका वरोरा याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने वरोरा व चंद्रपूर शहरातून दोन दुचाकी वाहन चोरल्याची कबुली दिली.

त्याच्या कडून हिरो स्प्लेंडर एमएच ३४ बी एन 65 98 व हिरो एचएफ डीलक्स एम एस 34 ए झेड 65 42 या दोन दुचाकी 90 हजार रुपये किमतीच्या जप्त करून राजू बालाजी दुर्वे यास अटक केली. दोन चोरट्याकडून वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पाच दुचाकी वाहने अवघ्या काही दिवसात जप्त केल्याने दुचाकी वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, दिलीप सुर, किशोर बोढे, दिनेश मेश्राम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)