Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी तहसीलदार व ठाणेदारांना शिवसेनेचे निवेदन #chandrapur #bhadrawatiभद्रावती:- भद्रावती शहरातील व तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन येथील तहसीलदार व ठाणेदार यांना शिवसेनेतर्फे नुकतेच सादर करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या आदेशानुसार तथा जिल्हा सहसंपर्कप्रमुख बंडूभाऊ हजारे यांच्या सूचनेनुसार शिवसेना तालुका प्रमुख नरेश काळे तथा ज्येष्ठ शिवसैनिक मोहीतकर गुरुजी यांच्या नेतृत्वात भद्रावती तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे सुगंधी तंबाखू, रेती, गांजा व इतर तत्सम अवैध धंदे राजरोसपणे चालू आहे. याला आळा बसण्याकरिता भद्रावती शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे व ठाणेदार बिपीन इंगळे यांना दि.२७ फेब्रुवारी रोजी निवेदन सादर केले.

भद्रावती शहराला ऐतिहासिक नगरी हा दर्जा आहे. हा दर्जा कायम राहावा. भद्रावती शहराची शांतता अबाधित राहावी याकरिता हे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना भद्रावती शहर महिला आघाडी प्रमुख तृप्तीताई हिरादेवे, शुभांगीताई मेश्राम, मानकर, बालू पतरंगे, विलास मडावी, मेश्राम, गजानन हिरादेवे व सनी दामेधर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत