Top News

भद्रकला महोत्सवात डॉ.मिर्झा बेग ची धावणारी विनोदी मिर्झा एक्सप्रेस #chandrapur


भद्रावती:- स्थानिक साईप्रकाश बहू. कला व शिक्षण संस्थेद्वारा दि.12 मार्च ला हुतात्मा स्मारक भद्रावती येथे एक दिवशीय भद्राकला महोस्तव 2023 चे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रथम सत्रात सकाळी 8 वाजता बालकांची चित्रप्रदर्शनी व प्रात्यक्षिक राहणार आहे.त्यात उदघाट्क मा. आशालता सोनटक्के, मुख्याध्यापीका चित्रकार किरण पराते,अध्यक्ष कलाध्यापक संघ चंद्रपूर व चित्रमूर्तिकार कार्तिक नंदुरकर सचिव कलाध्यापक संघ चंद्रपूर यांचे विध्यार्थ्यांना कला प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच बालचित्रकारांचा सत्कार राहणार आहे. दुसरे सत्र सायंकाळी 4 वाजता बालकवी संमेलन 'अबडक डबडक ' या कविता संग्रहातून होणार आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाटककार बालकवी माजी मुख्याध्यापक शालिक दानव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक मिलिंद वाघमारे सर,सूत्रसंचालन मास्टर दर्शन देठे हे उपस्थित राहणार आहे.तृतीय सत्र सायंकाळी 6:30 वाजता सेवानिवृत्त मुख्याध्यापक शालिक दानव यांच्या ' अबडक - डबडक ' बालकविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय शिवरकर,चित्रपट पटकथा लेखक व सिनेदिग्दर्शक मुंबई, प्रमुख उपस्थिती हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी बेग, भाष्यकार अविनाशजी पोइनकर, पत्रकार साहित्यिक,प्रमुख अतिथी मा. प्रा. डॉ. देवेंद्र मनगटे सर साहित्यिक, मा. डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी, प. स. भद्रावती, मा. प्रवीण आडेकर गझलकार भद्रावती, मा. गुणवंत कुत्तरमारे, संतसाहित्याचे अभ्यासक, भद्रावती,उपस्थित राहणार आहे.

प्रकाशनंतर लगेच झी. टी. व्ही. मराठी हास्यसम्राट उपविजेते डॉ. मिर्झा रफी बेग यांचा 'मिर्झा एक्सप्रेस ' तुफानी विनोदी कार्यक्रम राहणार आहे. सर्व भद्रावतीकरांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने