Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशीपमध्ये भद्रावतीच्या पिता-पुत्रीने मिळविले सुवर्ण पदक #chandrapurभद्रावती:- येथील विश्वकर्मा नगरातील रहिवासी पिता-पुत्रीने नुकत्याच नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

नेपाळ येथील पोखरा येथे दि.११ फेब्रुवारी रोजी सहावी इंडो -नेपाळ आंतरराष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ६ ते १० वर्षे वयोगटात आकांशा आकाश कटलावार हीला सुवर्ण पदक मिळाले. तर तिचे वडील आकाश आनंदराव कटलावार यांना ३१ ते ४० वर्षे वयोगटात सुवर्ण पदक मिळाले.आकाश हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. तसेच येथील अष्टांग योग ॲन्ड नॅचरोपॅथी सेंटरच्या संचालिका डॉ. पूजा देऊरकर आणि त्यांची धाकटी बहीण यांनाही या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. ही चॅम्पियनशिप भारतातील एशियन इंडिया योगा कल्चरल फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारत आणि नेपाळ मधील स्पर्धक फार मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत