चंद्रपुरात श्रीराम जन्मोत्सव नेत्र दीपक भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन #chandrapur

Bhairav Diwase
0

विविध झांकी, देखावे, ढोल ताशा, चलचित्र यांचे प्रदर्शन


चंद्रपूर:- श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव समिती चंद्रपूर द्वारे आयोजित श्रीराम जन्मोत्सव यात्रा ही यशस्वीपणे भव्य दिव्य स्वरूपात सर्व समावेशक अशी पार पडली. प्राचीन काळाराम मंदिर येथून श्रीराम लल्ला यांचा विधिवत पूजन व ढोल ताशा च गजर करून ही शोभायात्रा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निघाली यावेळी गांधी चौक मुख्य शहर मार्ग जटपुरा गेट येथून चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गाने गिरनार चौक या मार्गे या शोभायात्रा मध्ये विविध भागातून आलेल्या रॅली झाले समायोजन झाले.

यावेळी शहरातील विविध चौकात स्थानिक उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक ,धार्मिक संस्था यांच्याद्वारे शोभायात्राचे स्वागत पुष्पगुच्छ पुष्पहार तसेच पूजन करून स्वागत करण्यात आले.

यावेळी विविध झांकी, प्रबोधनात्मक कार्यक्रम, चल चित्र या द्वारे चंद्रपूरकरांचे नेत्र दीपक असे प्रदर्शन करण्यात आले यावेळी चंद्रपूरकरांची मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशी गर्दी व उपस्थिती होती. विविध संस्थांनी गणेश मंदीर, माता मंदीर, शिव मंदिर यांनी सहकार्य व स्वागत केले, विविध देखावे सादर केले.

यावेळी सुदर्शन समाज तर्फे अमित राठोड, वाल्मिकी समाज तर्फे रितेश खोटे, सिख समाज तर्फे भाटियाजी, गोंड प्रधान समाज तर्फे तुषार पेंदोर, भोई समाज तर्फे कृष्णाजी नागापुरे एड. योगेश पचारे, देवराव पिंपळकर, चर्मकार समाज तर्फे कुलदीप पिंपळकर ,प्रकाश पिंपळकर यांच्या हस्ते श्री रामललाचे विधिवत पूजन करण्यात आले.

तसेच संपुर्ण श्रीराम जन्मोत्सव तथा शोभायात्रा समिती चंद्रपूरचे संपूर्ण कार्यकर्ते व श्रीराम भक्त यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शोभायात्राला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे तसेच प्रशासन चे आभार मानण्यात आले.
#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #Adharnewsnetwork #bhairavdiwase #Wardha #crimepatrol #crimenews #crime #police #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #nagpur #pombhurna #Gondwanauniversitygadchiroli #sardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #spchandrapur

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)