चंद्रपूर:- अतिक्रमित वनजमिनीवर रोपवन न करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला वनरक्षकासह तिच्या पतीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
सावली तालुक्यातील उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे व तिचे पती संजय अंताराम आतला अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. चंद्रपूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि. 17 एप्रिल) सायंकाळी केली.
याबाबत तक्रारदार यांनी चंद्रपूर एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांनी वनजमिनीवर अतिक्रमण केले होते. या वनजमिनीवर वनविभागाकडून रोपवन न करण्याच्या कामासाठी उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम पतीकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना वनरक्षक कुळमेथे यांच्या पतीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर वनरक्षक शारदा कुळमेथे यांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कार्यवाही ही श्री. राहुल माकणिकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, म.पो.अ. पुष्पा कोचाळे हे सर्व ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत