युवतीला खोटे कारण सांगून घरी बोलावून केला विनयभंग! #Chandrapur #bramhapuri #molestation #arrested

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- युवतीला खोटे कारण सांगून घरी बोलावून विनयभंग करणाऱ्या एका युवकाला पीडितेच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली. अतुल ईश्वर ठाकरे (३२, रा. बेलगाव) असे आरोपीचे नाव आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील पीडित युवती हि आई व बहिणीसोबत राहते. तालुक्यातील आरोपी अतुल ठाकरे याने खोटे कारण सांगून तिला घरी बोलावले व विनयभंग केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून त्याच्या तावडीतून सुटका केली व घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदवि ३५४, ३२३, ३ (१) डब्ल्यू, आय, ३(२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.