मुंबई:- नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका असलेला घर बंदुक बिरयाणी चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. भरपूर अॅक्शन्स, वेगवान सीन्स, जंगलात होणारे धमाके आणि रोमान्स यांनी सजलेला हा ट्रेलर आहे. चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासातच लाखो चाहते सुखावले आहेत.
🎫 आताच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून टिकीट बुक करा
All that you would like to explore and know about the movie Ghar Banduk Biryani @BookMyShow https://in.bookmyshow.com/chandrapur/movies/ghar-banduk-biryani/ET00355006
चित्रपटाची कथा उघड न करता कथेबद्दलची उत्सुकता हा ट्रेलर वाढवण्यात यशस्वी झाला आहे. ही कथा कोलागड या जंगलाची आहे. सुंदर जंगलाचा नजरा ट्रेलरच्या सुरुवातीला दिसतो. दूरवर पसरलेल्या डोंगरदऱ्यातून दोन व्यक्ती चालताना दिसतात. त्यांच्या हातात दूर्बिण आहे. ते लोक पोलिसांपासून स्वतःला वाचवत या जंगलाच्या आडोशात राहणारे आहेत. पोलीस त्यांच्या मागावर येतात तर जमिनीमध्ये स्फोटके पुरली जातात. पोलिसांती मोठी कुमक या जंगलात पोहोचते. बंडखोर आणि पोलिसांच्यात चकमक सुरू होत असतानाच जीवावर उधार झालेला पोलीस इन्पेक्टर नागराज मंजुळे पिस्तुल रोखून उभा असलेला दिसते. त्यानंतर नागराजचे कडक अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात.
मग एन्ट्री होते सयाजी शिंदेची. निर्भय, करारी हातातील बंदुकीने गोळीबार करतच तो एन्ट्री करताना दिसतो. त्यापाठोपाठा धावत एन्ट्री घेतो आकाश ठोसर. त्याच्यावर जंगलात आल्यामुळे गोळीबार सुरू होतो ते चुकवत आकाश जीवाच्या आकांताने धावताना दिसतो. यात तो राजू ही व्यक्तीरेखा साकारतोय असे दिसते. कारण तो बिरयाणी बनवताना दिसतो आणि राजूच्या हाताला सुगरणीवाणी चव असल्याचा संवाद ऐकायला मिळतो.
पुढे पोलीस आणि बंडखोर यांच्यात जंगलात धुमश्चक्री सुरू झालेली पाहायला मिळते. नागराजची पोलीस फौज विरुद्ध सयाजीचे बंदुकधारी बंडखोर यांच्या तुंबळ युध्द सुरू होते. आकाश ठोसरदेखील हातात बंदुक घेऊन बदला घेण्याची भाषा करताना दिसतो. नागराज, सयाजी आणि आकाश ठोसर यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखा आतून प्रेमळ आहेत. ते आपल्या प्रियजनांच्या प्रेमात गुंतलेले आहेत. यानंतर सायली शिंदे, दिप्ती देवी, श्वेतांबरी घुटे, सोमनाथ अवघडे यांच्याह चित्रपटातील इतर पात्रांच्या झलक पाहायला मिळतात.
आटपाट या बॅनरची निर्मिती असलेल्या घर बंदुक बिरयाणी या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत जंगल औताडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र असून गणेश आचार्य यांनी यातील गाणे कोरिओग्राफ केली आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत ७ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
#adharnewsnetwork, #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #warora #newtechnology #technology #technologyandmarketing #technologyanddevelopment #technologyandmanagement #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #digital #marketingservices #digitalmarketingcourse #digitalmarketing #Mobile #newmobile #movie #Mirajcinemachandrapur #theNdhotels #thendhotel #mdrMallchandrapur #MH34chandrapur #Tadoba #andhari #tadobaandhari #tadoba-andhari
#AssemblyElection2023 #आयपीएल २०२३ #आयपीएल२०२३टीम #आयपीएलगुणतालिका२०२३ #आयपीएल२०२३वेळापत्रक #TRENDINGTOPICS #NarendraModi #AmitShah #RahulGandhi #SharadPawar #EknathShinde #Uddhav Thackeray #DevendraFadnavis #RajThackeray #Sudhirmungantiwar #AjitPawar #AadityaThackeray #SanjayRaut #SupriyaSule #GautamAdani #Shivsena #BJP #Congress #NCP #MNS #MaharashtraPolitics, #pombhurna, #mul, #saoli, #sindewahi, #nagbhid, #bramhapuri, #chimur, #waroram #badrawati, #korpana, #Chandrapur, #jivati, #Rajura, #ballarpur, #gondpipari, #bhairavdiwase #rahulthorat #advrahulthorat #murder #Theft #police #arrested #accidentnews #news #breakingnews #carrier #katta #careerkatta #bhola #Dasara #Gharbandookbiryani #breakingnewsadharnewsnetwork #electronic #gadchiroli #death #viralvideo #Socialmedia #rape #rapecase