Top News

अजय देवगणचा 'भोला' पहायचा की नानीचा 'दसरा'? Movie


संभ्रमात असाल तर आधी कमाई पहा!


बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये टक्कर पहायला मिळतेय. यातील पहिला चित्रपट हा बॉलिवूडच्या अजय देवगणचा आहे तर दुसरा साऊथ सुपरस्टार नानीचा आहे.


भोलाआणि दसरा हे दोन्ही चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाले. त्यामुळे बॉक्स ऑफिस कमाईबाबत या दोन्ही चित्रपटांची तुलना केली जातेय. ‘दृश्यम 2’नंतर अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. मात्र कमाईच्या बाबतीत नानीच्या ‘दसरा’ने पहिल्या तीन दिवसांत ‘भोला’ला मात दिली आहे. या दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात..

अजय देवगणच्या ‘भोला’ने पहिल्या दोन दिवसांत 18.60 कोटी रुपयांची कमाई केली. तर नानीच्या ‘दसरा’ने 32.95 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 11.20 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 7.40 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये कमावले. दुसरीकडे ‘दसरा’ने पहिल्या दिवशी 23.2 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 9.75 कोटी रुपये आणि दिसऱ्या दिवशी 13 कोटी रुपये कमावले.

'भोला'ची ही कमाई 'दृश्यम 2'च्या तुलनेत कमी आहे. दृश्यम 2 ने पहिल्या दिवशी जवळपास 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र वीकेंडदरम्यान भोलाच्या कमाईत चांगली वाढ होऊ शकते असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. भोलाचा बजेट 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातंय.

All that you would like to explore and know about the movie Bholaa @BookMyShow https://in.bookmyshow.com/chandrapur/movies/bholaa/ET00326977


संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, आमला पॉल, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि कैदी भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते.

All that you would like to explore and know about the movie Dasara @BookMyShow https://in.bookmyshow.com/chandrapur/movies/dasara/ET00316318


दुसरीकडे ‘दसरा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केलं आहे. यामध्ये दारूचा व्यापार, गावातील राजकारण, जातपात, मैत्री आणि प्रेम कहाणी या सर्वांचं मिश्रण पहायला मिळतंय. या चित्रपटात नानीसोबत किर्ती सुरेशची मुख्य भूमिका आहे.

#adharnewsnetwork, #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #warora #newtechnology #technology #technologyandmarketing #technologyanddevelopment #technologyandmanagement #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #digital #marketingservices #digitalmarketingcourse #digitalmarketing #Mobile #newmobile #movie #Mirajcinemachandrapur #theNdhotels #thendhotel #mdrMallchandrapur #MH34chandrapur #Tadoba #andhari #tadobaandhari #tadoba-andhari 
#AssemblyElection2023 #आयपीएल २०२३ #आयपीएल२०२३टीम #आयपीएलगुणतालिका२०२३ #आयपीएल२०२३वेळापत्रक #TRENDINGTOPICS #NarendraModi #AmitShah #RahulGandhi #SharadPawar #EknathShinde #Uddhav Thackeray #DevendraFadnavis #RajThackeray #Sudhirmungantiwar #AjitPawar #AadityaThackeray #SanjayRaut #SupriyaSule #GautamAdani #Shivsena #BJP #Congress #NCP #MNS #MaharashtraPolitics, #pombhurna, #mul, #saoli, #sindewahi, #nagbhid, #bramhapuri, #chimur, #waroram #badrawati, #korpana, #Chandrapur, #jivati, #Rajura, #ballarpur, #gondpipari, #bhairavdiwase #rahulthorat #advrahulthorat #murder #Theft #police #arrested #accidentnews #news #breakingnews #carrier #katta #careerkatta #bhola #Dasara #Gharbandookbiryani #breakingnewsadharnewsnetwork #electronic #gadchiroli #death #viralvideo #Socialmedia #rape #rapecase 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने