चंद्रपूर जिल्ह्यात एकाच रात्री ३ ठिकाणी चोरी #korpana(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- एकाचं रात्री एक दुकान व दोन घरून चोरट्यांनी विविध मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२ ते ३ वाजताच्या सुमारास घडली.

पहिल्या घटनेत मेन रोड वरील डायमंड ज्वेलर्स येथील शटरचे लॉक कटर च्या सह्ययाने तोडून ज्वेलर्स मधील वेगवेगळे चांदीचे जोडवे, चाळ, पैजन, बीचवे आदी वस्तू अंदाजे किंमत ४६ हजार रुपये लंपास केले. याची तक्रार ज्वेलर्स मालक अब्दुल मोहम्मद यांनी दाखल केली आहे.

दुसऱ्या घटनेत कोरपना येथील वामन मेश्राम यांच्या घरच्यां अंगणातून एम एच ३४ सी सी ५६४५ क्रमांकाची शाईन गाडी अंदाजे किंमत ८० हजार चोरट्यानी लंपास केली.

तिसऱ्या घटनेत कोरपना येथील पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत कर्मचारी ज्ञानेश्वर भुसारी यांच्या घरची एम आय ची फ्लॅट एल ई डी टी वी अंदाजे किंमत १० हजार रुपये व रोख सतरा हजार रुपये ची रक्कम लंपास केली. या सर्व घटना एकाच दिवशी बारा ते तीन या तीन तासातच तीन दिल्यानं चोरीच्या घटना घडल्याने कोरपनात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय शुक्ला, अमर राठोड व कोरपना पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या