चंद्रपुरात कैद्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण #chandrapur #police


व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- मानसिक रुग्ण असलेल्या एका कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेणाऱ्या पोलिस शिपायास त्या कैद्याने झाडूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो व्हिडिओ मागील आठवड्यातील असल्याचे बोलले जात आहे. तसेच तो पोलिस शिपाई मद्य प्राशन करून होता, अशी चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

चंद्रपूर जिल्हा कारागृहात मागील अनेक महिन्यांपासून एक मानसिक रुग्ण असलेला कैदी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तो विचित्र वागतो. या कैद्याची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. मात्र, ज्या पोलिस शिपायाने त्याला रुग्णालयात नेले तो पोलिस शिपाई स्वतः दारूच्या नशेत धुत होता. दरम्यान, कैद्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. त्याने रुग्णालयामध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस शिपायास मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करून त्याला सोडवले.

मारहाण सुरू असताना एकाने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. आता हा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत