Top News

खा. बाळू धानोरकर यांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका वरोऱ्याला रवाना #chandrapur


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

नागपूर:- काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते अवघ्या 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मागील दोन दिवसांपासून बाळू धानोरकर व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे कुटुंबिय देखील दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्य प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काल मिळत होती. मात्र आज रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. नागपूर येथून खा. बाळू धानोरकर यांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका वरोऱ्याच्या दिशेने रवाना झाली आहे. आ. प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत शिवानी वडेट्टीवारही वरोऱ्याला रवाना झाले आहेत. आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. 

खासदार बाळू धानोरकर यांचे निधन




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने