‘हद्द 2’ एक अनहोनी घटना या चित्रपटाचं टिझर रिलिज #chandrapur #teaser


चंद्रपूर:- चंद्रपूरचे प्रख्‍यात युवा चित्रपट निर्माते देवा बुरडकर आणि प्रितम खोब्रागडे यांनी एस. के. प्रोडक्‍शन चे माध्‍यमातून एक सर्वांगसुंदर पर्यावरण संदेश देणारा मराठी चित्रपट "हद्द एक मर्यादा" ची निर्मिती केली होती ज्‍याला चंद्रपुरातील चित्रपट रसिकांनी भरभरुन सहभाग व सहकार्य केले. त्‍यांच्‍या ट्रेलर प्रदर्शन कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, सांस्‍कृतिक, नाट्यवंत, वनविभाग, पोलिस विभाग समवेत सर्व क्षेत्रातील दिग्‍गजांनी आपले आशिर्वाद व शुभेच्‍छा प्रदार केल्‍या होत्‍या आणि दुस-या कलाकृतीची ही मागणी केली होती त्‍यानुसार हद्द 2 एक अनहोनी घटना ची निर्मिती अंतिम टप्‍यावर पोहचली असून ‘हद्द 2’ एक अनहोनी घटना चित्रपटाचं टिझर रिलिज करण्यात आला आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर, हि कथा होती २०१७ ची, हि कथा होती एका पर्यावरणाची, हि कथा होती बापलेकाच्या प्रेमाची, हि कथा होती खुनशी पितापुत्राची, हि कथा होती दोन मित्रांची, हि कथा होती पोलीस आणि खुनाची, हि कथा होती पतीपत्नीच्या विरहाची, हि कथा आहे २०२३ ची .... असं म्हटलं आहे. त्यानंतर एक पोलीस आपल्या बुलेट वरून जात आहे. आरोपी कितीही शातीर असला तरी घटना घडवतांना पुरावा सोडतोच. आणि पुराव्यावरुनच सुगावा लागते. इन्स्पेक्टर कदमच्या नजरेत ते पुरावे येतात जे आरोपी लपवू शकत नाही. लवकरच येत आहोत गुन्हेगारी करणाऱ्यांना गजाआड करण्याकरिता असं या ‘हद्द 2’ एक अनहोनी घटना चित्रपटाचं टिझर मध्ये सांगण्यात आले आहे.
‘हद्द २’ एक अनहोनी घटना हा सुध्‍दा मराठी चित्रपट आहे. याही चित्रपटात एक सामाजिक संदेश देण्‍याचा पुरेपुर प्रयत्‍न निर्माते देवा बुरडकर आणि प्रितम खोब्रागडे यांनी केला आहे. पुर्णपरिवार एकत्र बसुन आनंद घेईल असे कथानक आणि निर्मितीवर पुर्ण भर देण्‍याचा निर्मात्‍यांचा मानस आहे. चित्रपटात शंभर टक्‍के जनतेचा सहभाग असेल चित्रीकरण शहरातच राहील, जिल्‍ह्यातील सुप्रसिध्‍द वास्‍तुंचे चित्रीकरण होईल. स्‍थानिय कलावंताना वावं मिळेल. चंद्रपूरचा नाव लौकीक होईल या बाजू ध्‍यानात ठेऊन चित्रपट निर्मितीचे प्रारंभिक कार्य पार पडून कथानक, तांत्रीक बाब यांची जुळवणी अंतिम टप्‍यात आली आहे. नुकताच ‘हद्द 2’ एक अनहोनी घटना चित्रपटाचं टिझर रिलिज करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या