चंद्रपुरात 60 बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई #chandrapur

चंद्रपूर:- सायलेन्सर मध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाजात स्टंटबाजी करणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईची मोहीम उघडली आहे. 60 जनाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरात बुलेट मोटार सायकल स्वार हे सायलेन्सर मध्ये फेरबदल करुन कर्णकर्कश आवाजात स्टंटबाजी करीत असल्याचे पोलीस विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच गर्दीचे ठिकाणी सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज काढीत असल्याबाबत नागरीकांकडुन वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतुक नियंत्रणा शाखा चंद्रपूर तर्फे अशा बुलेटस्वारांवर कारवाई करण्याकरीता पथक तयार करुन जानेवारी ते माहे मे 2023 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान कर्णकर्कश आवाज व सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्या 60 बुलेटस्वारावर कलम 198 व 194 (एफ) मोटार वाहन कायदा अन्वये दंडात्मक कारवाई करुन सायलेन्सर जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांचे नेतृत्वात वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली. यापुढे सुध्दा ही मोहीम सतत राबविण्यात येणार आहे. नागरीकांनी आपल्या वाहनातील सायलेन्सर मध्ये कोणतेही फेरबदल किंवा कर्णकर्कश सायलेन्सर लावु नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा चंद्रपूर पोलीस दलातर्फेदेण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत