"त्या" गंभीर जखमी मुलींची भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम यांची सांत्वन भेट #chandrapur #pombhurna #murder #pombhurnamurder

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- पोंभूर्णा तालुक्यातील पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीतील डोंगर हळदी माल येथील मनोज लेनगुरे हा आपल्या पत्नीवर नेहमीच चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमीच भांडण व्हायचे. मंगळवारला रात्रो तीन वाजताच्या दरम्यान आरोपी मनोज लेनगुरे यांनी घराच्या स्लॅपवर आपल्या दोन मुलींसह गाढ झोपेत असलेल्या पत्नी आशाच्या डोक्यात धारधार कुऱ्हाडीने वार करून ठार मारले. तर मोठी मुलगी अंजली व लहान मुलगी पुनम ह्याच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. यात दोन्ही मुली गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी कुटुंबियांची विचारपूस व सांत्वन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. निराधार झालेल्या मुलींना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मदतीचा हात देताना काळजी व्यक्त केली. यावेळी बंडू बुरांडे सरपंच ग्रामपंचायत जामखुर्द, जनार्दन लेनगुरे उपस्थित होते.

दोघींनाही नागपुरात हलविले

मोठी मुलगी अंजली व लहान मुलगी पूनम यांच्यावर निर्दयी बापाने कुन्हाडीने घाव घातला. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने दोघींनाही मंगळवारी सायंकाळी नागपुरातील रुग्णालयात हलविण्यात आले..

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)