छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी जोपासावा - हंसराज अहिर

Bhairav Diwase
0
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी जोपासावा:- हंसराज अहिर

राजुरा येथे 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न.

विविध मान्यवरांसह, गुणवंत विध्यार्थी, महिलांचा केला सत्कार.

राजुरा:- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने स्वागत समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजांनी जुलमी, अत्याचारी व अन्यायी सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील विश्वासू मावळ्यांना एकत्र करून जगाच्या इतिहासात न्यायाचे, सत्याचे, स्त्री सन्मानाचे, समता व बंधुत्वाचे वातावरण असणारे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्माण करण्यात बारा बलुतेदारासह  विविध जाती-धर्मातील लोकांचा सहभाग घेतला. स्वराज्य रक्षणार्थं अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचे हौतात्म्य, बलिदान, त्याग, समर्पण इत्यादी चिरकाल स्मरणात राहावे व नवीन पिढीने हा आदर्श समोर ठेवून स्वाभीमानाने जीवन जगावे आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाट्क हंसराज अहिर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष, इतर मागासवर्ग आयोग भारत सरकार यांनी यावेळी केले.


अॅड. यादवराव धोटे स्मृती महाविद्यालय,  राजुरा येथे 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि ऍड. संजय धोटे, माजी आमदार तथा अध्यक्ष, शिवराज्यभिषेक सोहळा समिती हे होते.  तर प्रमुख अतिथी म्हणून सुदर्शन निमकर, माजी आमदार राजुरा, अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तथा स्वागताध्यक्ष,शिवराज्यभिषेक सोहळा समिती, सुधीर धोटे, अध्यक्ष, यादवराव धोटे मेमोरीयल सोसायटी राजुरा, संजय पावडे, उप सभापती, कृ. बा. स.राजुरा , खुशाल बोन्डे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्र विस्तारक, नंदकिशोर वाढई, सरपंच ग्रा. पं. कळमना, सुरेश केंद्रे, महेश देवकते, निलेश ताजणे, सतीश उपलंचिवार, राधेश्याम अडानिया, आशिष करमरकर, स्वप्नील मोहुर्ले, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले, महासचिव, शिवराज्यभिषेक सोहळा समिती, डॉ. दिनेश दुर्योधन यांनी केले. प्रास्ताविक अविनाश जाधव, स्वागताध्यक्ष यांनी तर आभार प्रा. इर्शाद शेख यांनी मनले. यावेळी नाविन्यपूर्ण शेती व्यवसाय करणारे शेतकरी यांना सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, टिफिन बॉक्स, तुळीचे बियाने पॉकेट भेट देऊन सत्कार करण्यात आला. अठरा पगड जातीतील जातीय आधारित व्यवसाय करणारे व वेगवेगळ्या जाती समाजाचे प्रमुख,  समाजातील सामाजिक कर्तव्य पार पाडणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, समाजकार्यात युवा सहभाग यांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेतील यश प्राप्त विद्यार्थी, बारावीतील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी,  शेतकाम, शेतमजुरी, करणाऱ्या शंभर कष्टकरी महिलांचा साडीचोळी, भाजीपाला बियाने देऊन सत्कार करण्यात आला. ऍड. यादवराव धोटे महाविद्यालय च्या विध्यार्थीनी छ. शिवाजी महाराज, जिजाबाई, सईबाई, मावळेची वेशभूषा  परिधान करून उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले तर जीवती तालुक्यातील येल्लापूर निवासी सांभाजी ढगे यांनी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्यगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. असे यावेळी शिवराज्यभिषेक सोहळा समिती चे अध्यक्ष तथा माजी आमदार ऍड. संजय धोटे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)