युवासेना शहर प्रमुख स्वप्निल मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.
राजुरा:- युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे, युवासेना विभागीय सचिव निलेश दादा बेलखेडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिरे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कुणालभाऊ कुडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 28 नोव्हेंबर 2022 ला वन विभागाच्या निवासी वसाहत मधील झाड बस स्थानकावर पडल्याने छत कोसळले त्या घटनेमध्ये मनोज पाझारे नावाच्या विद्यार्थी जखमी झाला होता व आता काही दिवसातच 26 जून पासून शाळा चालू होणार आहे व पावसाळा पण लागणार आहे अशा वेळी विद्यार्थ्यांना व ये-जा करणाऱ्या प्रवासांना बस स्थानकाच्या छताच्या खाली उभे राहणे धोकादायक ठरत आहे. बस स्थानकावरून प्रवास करणार्या विद्यार्थी किंवा प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. आणि मागील काही दिवसांपासून प्रवाशांचे पैसे व दाग दागिने चोरीच्या तक्रारी वाढली आहे व काही महिन्यांपूर्वी बस स्थानकाच्या आवारात एका युवकाची हत्या झाली होती अशा प्रसंगी सी.सी.टीव्ही कॅमेरा व स्ट्रीट लाईट ची खूप गरज आहे. म्हणून लवकरात लवकर छत दुरुस्ती करून व सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी निवेदन देताना युवा सेना शहर प्रमुख स्वप्निल मोहुर्ले, युवा सेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवा सेना उपशहर प्रमुख श्रीनाथ बोलुवर, युवा सेना उपतालुका प्रमुख प्रविण पेटकर,