अन् तो देत आहे थॅलेसीमिया मेजर आजाराशी झुंज.
अर्थिक मदतीचे आव्हान.
कोरपना:- सामान्य नागरिकाना आजार म्हटल की मानसिक ताण तणाव आणि पैसाची जुळवा जुळव त्यातल्या त्यात मोठा आजार म्हटल तर सर्व कुटुंब त्यात ओढल जात आणि आपण या आजारातून कधी मुक्त होईल याची सारखी चढाओढ सुरू असते. असाच काहीसा प्रकार नांदा येथील नांदेकर कुटुंबियांवर मागील ४ वर्षा पासून संकट ओढवल असून त्याचा मुलगा थॅलेसीमिया मेजर या आजाराने ग्रस्त असून तो रोज जिवन जगण्यासाठी आजाराशी झुंज देतो आहे.
सविस्तर वृत्त असे की,
नांदा येथील यादव मार्खडी नादेकर यांचा ४ वर्षीय धीरज नामक मुलगा थॅलेसीमिया या आजाराने ग्रस्त आहे. जन्मास आल्या नंतर काही महिन्यांनीतच कळलं की बाळाला काहीतरी आजार झाला आहे. पण नेमका कोणता आणि कसला आजार आहे हे त्यांना कळत नव्हते त्यांनी अनेक दवाखान्यात दाखविले परंतू परिपूर्ण आजाराची माहिती कळत न्हवती वर्ष लोटले बाळाचा टेस्ट करण्यात आल्या आणि तेव्हा कळलं की बाळाला थॅलेसीमिया मेजर आजार झालं आहे. या आजाराची तीव्रता ऐकून कुटुंब हादरल आजार झाला परंतू याचाशी आपण सामना करून मुलाला बर कस करायचा हा प्रश्न वडील आणि कुटुंबीयांना पडला.
धीरज वर उपचार सुरू झाला तो म्हणजे महिन्यातून एकदा जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेने आणि त्याला रक्त चढवणे हे नित्य नेमाचेच झाले. परंतू या आजारावर कायमची मात कशी करता येईल या साठी वडील व कुटुंब सतत धडपडत होते. एका मित्राने त्यांना बंगळूर येथील दवाखाण्यात नेण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी बंगळूर येथील दावाखण्यात नेले सर्व टेस्ट करून तिथे इलाज सुरू झाला परंतू पैशाची चणचण त्यामुळे २ ते ३ महिन्यातून एकदा उपचार करून ने आन करणे सुरू झाले. सतत ३ वर्ष उपचार सुरू होते. शेवटी डॉक्टर यांनी ट्रान्सप्लांट सल्ला दिला त्यामुळे धीरज चा आजार पूर्ण बरा होईल असे सांगण्यात आले.
(बंगळूर बोम्मासद्रा येथील मुजूमदार शा मेडीकल सेंटर येथे ४ वर्षीय धीरज वर उपचार सुरू आहे तो अत्यंत गंभीर अवस्थेत असून त्याला शेवटचा उपाय आणि उपचार म्हणजे बोन मॉरो ट्रान्सप्लांट सल्ला डॉक्टरांनी दिला असून यासाठी ३६,३०,०००/- रूपये (छत्तीस लाख तीस हजार रूपये) खर्च लागणार आहे.)
( थॅलेसीमिया हा आजार आनुवाशिक असते. आई, वडीला मार्फत हा आजार येणाऱ्या बाळाला होत असतो. ज्या मुलाला आजार झाला त्याला नेहमी रक्त पुरवठा करावा लागतो. विशेष म्हणजे आई, वडील दोघांना मायनर थॅलेसीमिया असेल तर होणाऱ्या बाळाला थॅलेसीमिया मेजर हा आजार होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.)
(माझी आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने एवढा मोठा खर्च मला झेपावनारा नाही. काही नागरीक मदत करत आहे परंतू मुलाला जीवनदान देण्या साठी अधिक मदतीची गरज आहे. :- यादव नांदेकर नांदा, धिरजचे वडील)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत