चंद्रपुरात अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर बॅटने वार; उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू #chandrapur #bat

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूरात शनिवारी (दि. ३) क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मुलाने एकाच्या डोक्यावर बॅटने वार करीत त्याची हत्या केली होती. घटना घडल्याच्या चार दिवसांनंतर या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. A minor was hit on the head with a bat in Chandrapur; Death of child during treatment

चंद्रपूर शहरातील बगडखिडकी परिसरात काही मुले क्रिकेट खेळत होते. खेळण्यावरून दोन गटात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर बॅटने वार केला. तो मुलगा जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. मृतक मुलाच्या आईने (६ जून) चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मुलाच्या हत्येबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीनंतर खूनाचा चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतक मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता झाल्यावर पुरलेला मृतदेह काढून त्याचं शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)