रुग्णसेवक स्व. जिवन तोगरे‌ मृत्यू प्रकरणी गृहमंत्र्यांना निवेदन #chandrapur #jiwati


जिवती:- गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मार्फत तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिवती यांना निवेदन देण्यात आले स्वर्गीय जीवन राजाराम तोगरे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय तपासणी मार्फत चौकशी करून घातपात असल्यास आरोपीस कटोरात कठोर शासन करणे बाबत सर्वपक्षीया कडुन जिवती तहसीलदारा मार्फत गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य याना निवेदन देण्यात आले.

स्वर्गीय जीवन राजाराम तोगरे वय 24 वर्ष रा.पाटागुडा पो. टेकामांडवा ता. जिवती जि. चंद्रपूर यांच मृतदेह दि. ४/०६/२०२३ ला मरकागोंदी येथील शेतशिवारात आढळून आलेला आहे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे जागेवरच पोस्टमार्टम करण्यात आलेले मृत्यू बाबत समाजामध्ये तर्क वितर्क लावले जात आहे त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय तपास यंत्रणेबाबत करण्यात यावा आणि जर घातपात झाला असेल तर प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि स्व.जिवन तोगरे यांच्या मृत्यूचे खरे कारण सर्वांना कळविण्यासाठी व जिवन तोगरे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवुन देण्यात याव अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी डाॅ.अंकुश गोतावळे बालाजी वाघमारे दशरथ पलमेटे कृष्णा चव्हाण ज्ञानोबा तोगरे अंकुश कांबळे नवनाथ जांभळे दत्ता तोगरे मधुकर गायकवाड मनोहर गायकवाड विजय गोतावळे दत्ता गायकवाड रंगराव तोगरे आदिसह महिलांची संख्या होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या