ब्रम्हपुरी तालुक्यात समाज हितासाठी अखिल कुणबी समाज एकवटला #chandrapur #bramhapuri


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये कुणबी समाज मोठ्या संख्येने असून विविध पोट जातीमध्ये विखुरला असल्याने या समाजामध्ये एकी बघायला मिळत नव्हती.मात्र कुणबी समाजातील विविध पोट जातील मधील युवा वर्ग एकत्र येवून व अखिल कुणबी समाज मंडळाच्या अत्यारीत या युवावर्गांनी अनेक उपक्रम राबवण्याची योजना आखली आहे.

अखिल कुणबी समाज मंडळाद्वारे ब्रम्हपुरी येथे ०.३६ हे.आर शेतजमीन खरेदीचा करारनामा करण्यात आला असून या जागेची खरेदी करण्याकरिता एकूण ९७ लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे व खरेदी पत्र बनवण्याकरिता अंदाजे तीन ते चार लाख रुपयाची परत गरज आहे.असे एकूण एक करोडच्या वर रुपये रक्कम या शेतजमिनीच्या खरेदी करिता लागणार आहे व बांधकामाकरिता याहीपेक्षा मोठी रक्कम लागणार आहे. याकरिता मुरलीधर मंदिर देवस्थान टिळक नगर ब्रम्हपुरी येथे आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी अखिल कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ऋषी राऊत,गोविंदराव भेडारकर,प्रमोद चिमूरकर,योगेश मिसार,फाल्गुन राऊत,महेश भर्रे,गोवर्धन दोनाडकर,उमेश धोटे,विलास दुपारे,मोंटू पिलारे, विनोद झोडगे,दामोधर शिंगाडे,भाऊराव राऊत,प्रेमलाल धोटे,संतोष पीलारे,विनोद चौधरी, राहुल भोयर,रुपेश देशमुख,प्रेमंचंद अवसरे,अविनाश राऊत,रामकृष्ण चौधरी,नारायण मेश्राम व कुणबी समाजातील सर्व बांधव उपस्थित होते.
💟
यावेळी कुणबी समाज भवन निर्माणकरता कुणबी बांधवांनी वज्रमूठ बांधली असून समाजातील दानसुर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या