अक्षय भालेराव हत्याकांड निषेधार्थ भव्य जनआक्रोश मोर्चा #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी  
ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य म्हणुन व भारत हा लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारा देश म्हणुन संपुर्ण जगात नावारुपास असतांना,संविधानावर चालणाऱ्या या देशात जातीय भेद करणारी एक विकृती दिवसेंदिवस सक्रिय होतांना दिसत आहे.अशीच एक महाराष्ट्राला व देशाला काळिमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यातील बोन्डार (हवेली) या गावात घडली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणुन जातीवादी मानसिकतेच्या गावगुंडांनी अक्षय भालेराव या बौध्द तरुणाची निर्घृण हत्या केली व त्याच्या कुटुंबियांना गंभीर जखमी केले.इतक्या अमानुषपणे हत्या केली कि,त्या भीमसैनिकाचा कोथडा सुद्धा बाहेर काढला.अश्या जातीवादी प्रवृत्तीच्या मानसिकतेला आळा बसावा व देशांतील अनु जाती-अनु जमाती च्या लोकांवर होणारे अत्याचार थांबवावे,तसेच हत्या करणाऱ्या व हत्येस पाठबळ देणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची-जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी तालुक्यातील सर्व बौध्द समाजबांधवांच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.हा मोर्चा दि.१६ जुन २०२३ रोज शुक्रवारला डॉ.राजाभाऊ खोब्रागडे चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत घेण्यात येत आहे.

या मोर्चाचे निमंत्रक डेविड शेन्डे,लिलाधर वंजारी, प्रशांत डांगे,डॉ.स्निग्धा कांबळे,सुरज शेन्डे,पद्माकर रामटेके,ॲड.आशिष गोंडाणे यांनी सर्व बौध्द समाजबांधवांच्या बैठका घेऊन जास्तीत जास्त संख्येनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)