Click Here...👇👇👇

आंघोळ केली नाही म्हणून भिंतीवर डोकं आपटून पतीने केली पत्नीची हत्या #chandrapur #nagpur #murder

Bhairav Diwase

नागपूर:- सावली माहुली येथे पत्नीला बाथरूममध्ये लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत भिंतीवर डोके आपटून ठार केल्याची घटना ९ जूनला सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस प्राप्त माहितीनुसार रुक्मिणी गणेश घोडेस्वार (वय ४५) रा. सावली माहुली महिलेचे नाव आहे. गणेश घोडेस्वार (वय ५०)पतीचे नाव आहे. रुक्मिणी ही मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जाते. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असे.

पती गणेश हा कधी कधी पत्नीची आंघोळ ही करून देत होता. नऊ जूनला सायंकाळी सहा वाजता पत्नीची आंघोळ करून देत असताना पत्नीने आंघोळ करण्यास नकार दिला. यातून दोघांमध्ये वाद झाला.

रागाच्या भरात गणेशने पत्नीला लाथा बुक्क्याने मारहाण करीत तिचे डोके बाथरूमच्या भिंतीवर आपटले. त्यामुळे ती जखमी झाली. रुक्मिणी रात्री नऊ वाजता जेवणानंतर झोपी गेल्यानंतर १० जूनला सकाळी झोपून न उठल्यामुळे घरच्या मंडळींची तारांबळ उडाली.

तिला कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पती गणेश घोडेस्वार याला अटक केली.

रुक्मिणीला दोन मुली असून एक आठ वर्षाची व दुसरी सोळा वर्षाची आहे. अधिक तपास पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यशवंत सोलसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे करीत आहेत.