अडेगाव (देश) तें मानेमोहाळी मासळ मार्गाचा डांबरीकरण रस्ता निकृष्ट दर्जाचा #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0

अडेगाव देश येथील गावकऱ्यांनी केला रस्त्याचे कामबंद

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- अडेगाव ते माने मोहाली मासल मार्गाचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून अडेगाव देश येथील गावकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद केले आहे. डांबर न वापरता आईल वापरल्याचा आरोप गावकऱ्यानी केला आहे.
चिमूर तालुक्यातील अडेगाव देश ते मानेमोहाळी मासळ मार्गाचे पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत डांबर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे सदर रस्त्यावर 20 एम एम गिट्टी पसरवून खोदकाम न करता वरून चुरी मिश्रित डांबर पसरवून रस्ता तयार करण्यात येत असून काही किलोमीटर अंतरापर्यंत काम पूर्ण झाले असून सदर रस्ता निकृष्ठ दर्जाचा बनला असून डांबराचा वापर कमी केल्यामुळे व खोदकाम न केल्यामुळे नुकतेच तयार झालेल्या रस्त्यावर गड्डे पडले असून वाहन गेले तर रस्ता दबत जाऊन फुटत आहे व रस्ता बनवीत असताना निकृष्ट साहित्य वापरल्याने परिपक्व झाला नाही त्यामुळे हाताने सुद्धा गिट्टी बाहेर निघते तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी रस्त्यावर जाऊन सुरू असलेले साईड भरण्याचे काम बंद पाडून सदर रस्ता हा पुन्हा एकदा मजबूत बनवावा अशी मागणी करीत जर रस्ता कंत्रादारानें बनविले नाहीं तर रस्त्यावर संपूर्ण गावकऱ्यांचे सहित आंदोलन करण्याचा इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)