वीजतारांच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू #korpana


संग्रहित छायाचित्र 
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील वनसडी व पिपरी येथे दोन ठिकाणी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांत वीजतारांच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडल्या.

🌳अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू

वनसडी येथील घटनेत शेतात वीजखांब जमिनीवर पडला असताना विद्युतप्रवाह सुरू असल्याने जिवंत तारांना स्पर्श होऊन नारायण विश्वनाथ उरकुडे यांच्या मालकीचा बैल जागीच ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत पिंपरी येथील संतोष मुरलीधर पावडे यांच्या मालकीच्या बैलाने डीपीला स्पर्श केल्याने विजेचा धक्का बसून बैलाचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत