नेचर फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0

उच्च शिक्षणाच मार्गदर्शन

चिमूर:- नेचर फाउंडेशन द्वारा नुकत्याच लागलेल्या 12 वी मधील चिमूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व 12 वी नंतर काय ? यावर शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सत्कार समारंभात कार्यक्रमाचे उद्घाटक जनार्धन केदार ,अध्यक्ष शिक्षक सहकारी पतसंस्था,अध्यक्ष म्हणून निलेश ननावरे , सचिव नेचर फाउंडेशन
प्रमुख अतिथी प्रा.अतुल वाघमारे, मार्गदर्शक विशाल मेश्राम (FC कॉलेज पुणे),करण दोडके (IIT हैद्राबाद) आशिष ननावरे (TISS मुंबई),आकाश चौधरी, स्नेहा ननावरे(,संचालिका SI स्कूल भिसी) इत्यादी उपस्थित होते.यात नुकतीच निवड झालेले आशिष ननावरे (TISS मुंबई) व करण दोडके (IIT हैदराबाद) यांचा नेचर फाउंडेशन द्वारा अभिनंदनपर जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात पहिल्या सत्रात विशाल मेश्राम पुणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात शिक्षण का ? घ्यायचे,तिथलं वातावरण,कोर्सेस,होस्टेल, योजना याबद्दल मार्गदर्शन केले.दुसऱ्या सत्रात आशिष ननावरे(TISS मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक असलेली पारंपरिक पद्धत आणि ध्येय या पलीकडेही असणाऱ्या संधी यावर प्रकाश टाकत देशांतील नामांकित विध्यापिठात कोणत्या प्रकारे शिक्षण घेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.नंतर तिसऱ्या सत्रात करण दोडके (IIT हैद्राबाद) यांनी विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विध्यापिठात पदवी आणि पदव्युत्तर असणारे कोर्स आणि नौकरी च्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले.

12 वी नंतर पारंपरिक चौकटीत शिक्षण न घेता त्या पलीकडे असणाऱ्या जगात आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जाऊन देशांत धोरन निर्मिती करावी यांसाठी मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले पुढे अशा पध्दतीचे पुन्हा मोठे शैक्षणिक कार्यक्रम,उपक्रमाचे आयोजन करू अस प्रतिपादन नेचर फाउंडेशन चे सचिव निलेश ननावरे यांनी केले.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमर ठवरे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सागर दडमल यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेकरिता नेचर फाउंडेशनचे गुंजन सावसाकडे, गजबे, अस्मिता ढोणे, आकाश घोडमारे, निखिल मोडक, सोनू गळमले, आकाश घोडमारे व तालुक्यातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)